पद, पात्रता, निकष, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया(Talathi Bharti 2024)
तलाठी निवड पद्धत: आजच्या या blog मध्ये आपण Talathi Bharti 2024 तलाठी कसे बनायचे यासंबंधी सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. सोबतच तलाठी या पदासाठी पात्रता निकष काय आहेत हे पण आपण या blog मध्ये नमूद केले आहे.
महाराष्ट्रामध्ये तलाठी पदावर नियुक्त होण्यासाठी अनेक तरुण तयारी करतात, परंतु काही तरुणांना तलाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड कोणत्या निकषांच्या आधारे होते याचीच माहिती नसते.
तुम्ही तलाठी या पदासाठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अशी माहिती आहे. Talathi Bharti Syllabus, Talathi Bharti login, Talathi Bharti apply online,Talathi Bharti Majhi Naukri काळजीपूर्वक या blog दिलेली प्रत्येक बाब वाचून घ्या.
blog हा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक माहिती वाचा..
पात्रता :(Talathi Bharti 2024)
- Education Qualification– Talathi Bharti Qualifications
तलाठी पदासाठी अर्जदार उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन डिग्री मिळवलेला असावा. तसेच उमेदवाराने कम्प्युटरचा (MS-CIT) कोणताही कोर्स केलेला असावा, सोबतच उमेदवाराला मराठी आणि हिंदी या भाषांचे चांगले ज्ञान असावे. handicapped साठी goverment जॉब कसा भेटेल वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
- Age Limit – Talathi Bharti age limit
तलाठी बनण्यासाठी उमेदवाराची वय हे किमान एकोणवीस वर्षे ते 40 वर्षे असावे, जर उमेदवार 19 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल तर तो तलाठी या पदासाठी अर्ज सादर करू शकणार नाही. सोबतच उमेदवाराची वय जर 40 पक्षांच्या जास्त असेल तरी देखील तो तलाठी पदासाठी अर्ज करू शकणार नाही.
केवळ मागासवर्गीय SC, ST, OBC आणि इतर प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 19 ते 45 वर्षे वयाची अट असणार आहे.
तलाठी लेखी परीक्षा अभ्यासक्रम: Talathi Bharti 2024 Online Test
तलाठी भरतीसाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम हा एकूण चार विषयांमध्ये असणार आहे, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी.
- Exam Time – 2 घंटे
- Difficulty Level – डिग्री Exam
विषय | प्रश्न | मार्क्स |
मराठी | 25 | 50 |
इंग्रजी | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
100 | 200 |
तलाठी निवड पद्धत : Talathi Bharti online apply
तलाठी भरती साठी उमेदवारांची निवड ही दोन स्टेज द्वारे केली जाणार आहे, यामध्ये पहिल्यांदा जेव्हा भरतीची नोटिफिकेशन जाहिरात निघाली तेव्हा उमेदवारांना स्वतःचे अर्ज सादर करायचे आहेत.
- Writeen Exam (Online)
- Interview
- Document Verification
अर्ज सादर केल्यानंतर शासनाद्वारे आलेल्या अपडेट नुसार लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे, लेखी परीक्षा ऑनलाईन पार पडणार आहे TCS किंवा इतर कोणत्याही Online Platform वर ही Exam Conduct केली जाणार आहे.
लेखी परीक्षा मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल, मुलाखत योग्यरीत्या पार पडल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे Document Verification होईल. जर उमेदवार या दोन्हीही स्टेजमध्ये पास झाले, तर त्यांना तलाठी पदासाठी नियुक्ती दिली जाईल.
महाराष्ट्र तलाठी वेतन 2023 : Talathi Salary 2024
महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग 7 व्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र तलाठी वेतन 2023 ठरवतो.
ताज्या अपडेटनुसार, निवडलेल्या उमेदवारांना 25500-81100 रुपये मासिक वेतन आणि स्वीकार्य भत्ते मिळतील. पगाराव्यतिरिक्त, त्यांना काही फायदे देखील मिळतील जसे की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता इ.
महाराष्ट्र तलाठी वेतन: भत्ते आणि भत्ते
महाराष्ट्र तलाठी पदासाठी निवडलेले उमेदवार 7 व्या वेतन आयोगानुसार काही भत्ते, भत्ते आणि एकूण वेतन मिळण्यास पात्र असतील. महाराष्ट्र तलाठी भत्त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
- महागाई भत्ता (DA)
- वैद्यकीय सुविधा
- प्रवास भत्ते
- वैद्यकीय भत्ते
- वाढ आणि प्रोत्साहन
- घरभाडे भत्ते
- वाहतूक सुविधा किंवा वाहन
- भरपूर पितृ आणि मातृ रजा
- निश्चित वैयक्तिक वेतन
- सरकारी निवास (उपलब्धतेवर)
- आरोग्य विमा
- सशुल्क सुट्ट्या
- रजा आणि प्रवास भत्ता
- कामाचे प्रशिक्षण
महाराष्ट्र तलाठी जॉब (काम) प्रोफाइल काय आहे?
महाराष्ट्र तलाठी पदासाठी निवडलेल्या उमेदवारांनी पदावर रुजू झाल्यानंतर विविध भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र तलाठी नोकरी प्रोफाइल खालीलप्रमाणे आहे.
- महाराष्ट्र तलाठी पदाच्या जबाबदारीमध्ये जमीन महसूलाची विनंती आणि पावती यासंबंधी नोंदी ठेवणे देखील समाविष्ट आहे.
- तलाठी या नात्याने त्यांनी दर आठवड्याला पाऊस आणि पिकांशी संबंधित अहवाल उच्च अधिकाऱ्यांना सादर करणे आवश्यक आहे.
- त्यांनी जमीन महसूल अभिलेखांच्या प्रगतीचा मागोवा घेणे आवश्यक आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आवश्यक असेल तेव्हा ते सादर करणे आवश्यक आहे.
- त्यांनी पिकांची आणि सीमा चिन्हांची तपासणी देखील केली पाहिजे आणि कृषी नोंदी ठेवल्या पाहिजेत.
- तलाठी या नात्याने त्यांना शासनाने वाटप केलेले अधिकार आणि गाव फॉर्मच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
- जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तलाठी मंडळ निरीक्षकांना पीक नमुने आणि पीक कापणी चाचण्या तयार करण्यास मदत करा.
- तलाठी सामान्य लोकांसाठी संपर्काचे बिंदू म्हणून काम करतात आणि महसुलाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींना प्रतिसाद देतात. ते व्यक्तींकडून तक्रारी, प्रश्न आणि विनंत्या घेतात आणि आवश्यकतेनुसार समस्या त्वरित सोडवल्या जातात किंवा उच्च अधिकार्यांपर्यंत पोहोचवल्या जातात याची खात्री करतात.