मतदान करणे आवश्यक आहे का?
लोकशाहीत मतदान ही तरतूद आहे. लोकशाहीचा आत्मा म्हणजे मतदान, ते जर केले नाही तर लोकशाही मरून जाईल.
लोकांनी लोकांसाठी मतदान करून बनवलेली राज्यघडी हि अव्याहत पणे चालावी असे वाटत असेल तर मतदान केलेच पाहिजे.
दर पाच वर्षांत निवडणूका येतात तेव्हा मायबाप सरकार स्थापन करून आपल्या अडचणी दूर करण्यात आपण यशस्वी झालो तरच सर्वांगीण विकास साधता येईल. वैयक्तिक व राजकीय प्रगती होईल. मतदान करून वचक ठेवता येईल.
मतदान करणे आवश्यक आहे कारण आपण लोकशाहीत आहोत. हा आपला हक्क आहे आणि जरी आपली लोकशाही ही परफेक्ट नसली तरी आपण तिला त्यादिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आजपर्यंत आपल्या देशात एक सरकार असे यायचे जे समाजातल्या एकाच वर्गाचे प्रतिनिधित्व करायचे, कारण मतदानाला ते लोक एकगठ्ठा उभे राहायचे. आत्ता जेव्हा लोकांना हळूहळूहळू समजतंय तेव्हा लोक दुसऱ्या पक्षाकडे झुकू लागले. पण तुम्हाला तो पक्ष पण नाही आवडत तर तुम्ही तुमचे मत दिले पाहिजे.
लोकशाही मध्ये मतदान करून आपण सरकार निवडू शकतो तर मग ते सरकार फक्त 30%-40% मताधिक्याने का येते? याला कारण आपल्याकडे मतदानच कमी होते. आणि मग निवडुन आलेलं सरकार ला आपण शिव्या देतो, पण जर का आपण मतदानच केलेलं नाही तर कसे काय आपण कोणाला बोलायचे?
आपण ती जबाबदारी जोपर्यंत घेत नाहीत, हक्क आणि अधिकार समजत नाही तोपर्यंत ह्या समस्या राहणार त्रास होणारच आपल्याला.
त्यामुळे आपण सुशिक्षित होत आहोत तर मतदानकडे पण वळले पाहिजे.
आपण सुशिक्षित आहोत एव्हढे दाखवायला तरी आपण मतदान केले पाहिजे.
तर, वाचका तू आत्ता हे वाचले आहेस. तुला वाचता येतं, तशीच तुला समज पण आहे. तू पण जाशील अशी इच्छा व्यक्त करतो.😊
तुम्ही मतदान केले नाही तर काय होईल?
मतदानामुळे तुम्हाला देश कसा चालवला जात आहे हे सांगण्याची आणि तुमच्या मतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देण्याची शक्ती मिळते.
तुमच्या मताद्वारे तुमचा आवाज ऐकणे हा तुमचा अधिकार आहे आणि मतदान तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णयांवर परिणाम करण्याची सर्वात मोठी संधी देते.
तरुण मतदारांना निवडणुकीच्या परिणामांसह दीर्घकाळ जगावे लागेल, म्हणून आपल्या चिंता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.