निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23तारखेला मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.
आचारसंहितेची सुरुवात कशी झाली?
आता या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली? तर आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली.
राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करणार हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं.
1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967 च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले.
निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. पण आचारसंहितेतील काही नियम आयपीसीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात.
आचारसंहिता म्हणजे काय?
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक :
मतमोजणीची तारीख – 23 नोव्हेंबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
अर्ज पडताळणीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2024(सोमवार)
मतदानाचा दिवस – 23 नोव्हेंबर 2024
प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर.
निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते.
तरतुदी काय आहेत?
निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी सामान्य आचरणापासून ते सभा, मिरवणुका, मतदान, मतदान केंद्र, निरीक्षक आणि जाहीरनामा यांसाठी नियमावली निश्चित केली आहे.विविध जाती आणि समुदायांमध्ये मतभेद किंवा द्वेष वाढवणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नका. धोरणे आणि कृतींवर टीका करा, कोणत्याही पक्षाच्या, नेत्याच्या, कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका. कोणत्याही जाती-पंथाच्या भावनांचा गैरवापर करून मतदान करण्याचे आवाहन करू नका. मंदिर, मशीद किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये. मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल. मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांवर बंदी लागू करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या घरासमोर आंदोलने व धरणे करू नयेत. नेते त्यांच्या परवानगीशिवाय झेंडे, बॅनर लावू शकत नाहीत, नोटीस पेस्ट करू शकत नाहीत आणि घोषणा लिहू शकत नाहीत. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी अडथळे निर्माण करणार नाहीत किंवा इतर पक्षांच्या सभा किंवा मिरवणुकांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा सुरू आहेत त्या ठिकाणांजवळ कोणत्याही पक्षाने मिरवणूक काढू नये. एका पक्षाने लावलेली पोस्टर्स दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काढू नयेत.
मतदानाच्या दिवशी सूचना
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या अधिकृत कार्यकर्त्यांना बॅज किंवा ओळखपत्र द्यावे. निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांचे सहकार्य हवे. मतदारांना दिलेली स्लिप ही साध्या कागदावर असावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह, उमेदवार किंवा पक्षाचे नाव नसावे. मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या ४८ तास आधी दारूचे वाटप कोणालाही करू नये. मतदान केंद्राजवळ उभारलेल्या छावण्यांमध्ये अनावश्यक गर्दी करू नये. कॅम्प जनरल्सवर कोणतेही पोस्टर, ध्वज, बोधचिन्ह किंवा इतर प्रचारात्मक साहित्य प्रदर्शित करू नये. मतदानाच्या दिवशी वाहन चालवण्यासाठी परमिट असणे आवश्यक आहे.
मतदान केंद्र: मतदारांशिवाय, ज्यांच्याकडे निवडणूक आयोगाचा वैध पास नाही अशा कोणत्याही व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करू नये.
आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम
जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.
कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.
मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात. प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते.
मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार ‘भ्रष्ट आचरण’ आणि अपराध/गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये.
मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत. प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये. मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.