मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये प्रती महिना दिला जाणार आहे. या आगोदर ३ हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तिसऱ्या हफ्त्याचे पैसे कधी जमा होणार याकडे तमाम भगिनींचे लक्ष लागलेले होते. आता हि प्रतीक्षा संपलेली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या 3 ऱ्या हफ्त्याचे पैसे लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
उर्वरित तिसरा हफ्ता पुढील २९ सप्टेंबर २०२४ पासून महिलांच्यास बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
लाडकी बहिण योजना 3 रा हफ्ता मिळणार तुम्ही केला आहे का अर्ज
ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्यात पुम्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
अर्थात सप्टेंबर महिना अगदी संपत आला असून ज्या महिलांनी त्यांचे अर्ज परत सादर केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर सादर करून द्यावेत.
अर्ज करत असतांना अनेक महिलांचे अर्ज बाद झाले होते. कागदपत्रे अपलोड करतांना व्यवस्थित कागदपत्रे अपलोड होणे गरजेचे असते जेणे करून तुमचा अर्ज बाद झाला नाही पाहिजे.
हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या बँकेला आधार लिंक असणे आवश्यक आहे.
केवळ आधारच नव्हे तर शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी NPCI अर्ज देखील बँकेत सादर करणे गरजेचे आहे.