मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ वितरणाचा दुसरा टप्पा –

राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करुन लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या पैकी आधार सिडींग नसलेल्या लाभार्थ्यांना व्यक्तीशा बँकेत / पोस्टात जाऊन आधार सिडींग करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. तसेच नव्याने प्राप्त अर्जही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अंतिम मंजुरीने शासनाकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत.

आधार सिडींग करुन ई केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबाइल संदेश पाठविण्यात आला आहे, त्यांनी तातडीने आपले खाते आधार सिडींग करुन ई केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील महिलांना प्रत्येकी 3 हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे. आधार सिडींग करुन ई केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी आधार सिडींग करुन ई केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या  कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते..

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र

Leave a Reply

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Group FolLow Us