ध्वज फडकवणे ध्वजारोहण यात खुप फरक आहे हे फार कमी लोकाना माहित असेल. २६
जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाननिमीत्त राष्ट्रध्वज शीर्षस्थानी बाांधला जातो आणि तेथून ध्वज फडकवलाजातो , याला ध्वज फडकवणे असे म्हणतात.
तसेच, १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज वर खेचला जातो आणि नंतर फडकवला
जातो, याला ध्वजारोहण म्हणतात. जेव्हा आपल्या देशाला इंग्रंजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य
मिळाले तेव्हा इंग्रज सरकारचा ध्वज उतरून भारताचा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळे च
१५ ऑगस्टला दतरंगा वर खेचून फडकवला जातो.
- दोन्ही दिवशी स्वतंत्रपणे ध्वजारोहण : १५ ऑगस्टला देशाचे पंतप्रधान
दतरंगा फडकवतात (ध्वजारोहण करतात) तर , २६ जानेवारी रोजी
(प्रजासत्ताक दिन) देशाचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. - जागा: १५ ऑगस्ट (स्वातंत्रदिन) चा कार्यक्रमाचे आयोजन लाल
किल्ल्यावर करण्यात येते. या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तर
राजपथवर २६ जानेवारी (प्रजासत्ताक) दिनाचा काययक्रम होतो. यादिवशी
देशाचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. - राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. २६ जानेवारी १९५० रोजी देशाची
राज्यघटना लागूझाली. यामुळे राष्ट्रपती दरवर्षी २६ जानेवारी ला राष्ट्रध्वज
फडकवतात.