पॅन कार्ड (PAN CARD) :-कोणतंही सरकारी काम करायचं असलं की त्यासाठी आपल्याला पुरावा म्हणून अनेक गोष्टी लागतात त्यापैकी एक म्हणजे पॅनकार्ड. करदात्याच्या सोयीसाठी आणि त्याशिवाय आर्थिक सुरक्षा मिळावी आणि त्यासोबत सगळे व्यवहार सुलभ करण्यासाठी मोदी सरकारनं पॅनकार्डविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. नवीन पॅन कार्डमध्ये QR कोड असणार आहे. यावरून अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत की आता त्यांच्या जुन्या पॅन कार्ड च काय होणार?? त्यांना या नव्या पॅनकार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार का? त्यानंतर कधी आणि केव्हा पॅन कार्ड मिळणार? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी खाली वाचत रहा..!
पॅन कार्ड:- 1972 मध्ये पॅन कार्ड ची सुरुवात झाली.
*परमनंट अकाऊंट नंबर PAN CARD हा (10) दहा अंकी नंबर आहे, जो इकम टॅक्स डिपार्टमेंट कडून जारी केला जातो. याचा उपयोग फक्त ओलखपत्रासाठी न होता,आर्थिक व्यवहारसाठीही होतो.
PAN CARD ला 1972 मध्ये इन्कम टॅक्स च्या कलम 139 A नुसार जारी केले आहे.
नवीन पॅन कार्ड?
तुम्हाला नवं पॅन कार्ड मिळणार. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आधीपासून आहे. त्यांना नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही किंवा कोणताही फॉर्म भरण्याची देखील गरज नाही. नवं पॅन कार्ड तुमच्या घरी पोहोचवण्यात येईल. याचाच अर्थ तुमचं पॅन कार्ड हे ऑटो अपडेट होणार.
नवीन काय असेल?
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्याप्रमाणे पॅन कार्डचं हे नवं व्हर्जन असणार आहे. तर त्याचं नाव ( PAN Card 2.0) असेल. हे तसंच असेल पण त्याच नवे फिचर्स असतील. लोकांच्या पॅन नंबरमध्ये कोणताही बदल होणार नाही. तुमच्या पॅन कार्डचा नंबर तोच राहणार. या कार्डवर एक क्यूआर कोड असेल. याला स्कॅन केल्यानंतर करदात्यांची सगळी माहिती समोर येईल. QR कोड असलेल्या या पॅन कार्डमधून कर भरणं, कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं, बॅंकेत खातं सुरु करण्याची काम अगदी सोप्या पद्दतीनं होतात.
नवीन सुविधांमुळे काय फायदा होणार?
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्युआर कोड असल्यामुळे पॅन कार्ड धारकांची फसवणूक होणार नाही आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
नवीन पॅन कार्डची गरज का भासते?
अश्विनी वैष्णव यांच्यानुसार, पॅन कार्ड ऑपरेट करणारं सॉफ्टवेअर 15 ते 20 वर्ष जूनं झालं आहे. या सॉफ्टवेअरमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे या पॅन कार्ड सिस्टमला डिजीटली तयार करण्यात आलं आहे. जेणे करून कोणतीही तक्रार, ट्रान्जॅक्शन, कर फायलिंग सारख्या गोष्टींची खूप लवकर प्रोसेस करु शकतात. त्याशिवाय नवीन पॅन कार्ड सिस्टममधून फसवणूक करता येणाल नाही किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही. नवीन सिस्टमची गरज यामुळे झाली कारम भविष्यात पॅन कार्ड हे यूनिव्हर्सल आयडी म्हणून वापरता येणार आहे.
“पुराने पैन कार्ड में सुरक्षा की खामियां थीं, जिससे धोखाधड़ी के मामले बढ़ रहे थे। किसी व्यक्ति के पैन कार्ड से उसकी आइडेंटिटी थेफ्ट यानी पहचान की चोरी भी बढ़ने लगी थी। मौजदा वक्त में पैन कार्ड को ऑपरेट करने वाले सॉफ्टवेयर 15 से 20 साल पुराने हैं। इन सॉफ्टवेयर्स की वजह से कई बार परेशानी आ जाती है। इसलिए नए पैन कार्ड में सिस्टम को डिजिटल तौर पर तैयार किया जाएगा। नए सिस्टम की मदद से पैन कार्ड यूनिवर्सल आईडी की तरह काम करेगा”।
पॅन कार्डचे मुख्य फायदे खाली दिले आहेत.
- रोख आवक आणि बहिर्वाह ट्रॅक करा: सर्व रोख आवक आणि बहिर्वाह ट्रॅक करणे आणि कर अनुपालन पूर्ण करणे महत्वाचे आहे.
- इन्कम टॅक्स भरण्यासाठी: आयटी रिटर्न भरताना आणि आयटी विभागाकडून पत्रव्यवहार घेताना तुमचे पॅन कार्ड आवश्यक आहे.
- प्रत्यक्ष कर भरणे: डायरेक्ट टॅक्स भरताना तुम्हाला पॅन नंबर द्यावा लागेल.
- व्यवसाय नोंदणी: आपला व्यवसायच्या नोंदणीसाठी आपले पॅन कार्ड सबमिट करणे आवश्यक आहे.
- आर्थिक व्यवहार सुलभ करा: विविध आर्थिक व्यवहारसुलभ करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
- ओळखीचा पुरावा: पॅन कार्डवर तुमचे पूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, स्वाक्षरी आणि फोटो असतो; म्हणून, हे एक महत्त्वपूर्ण ओळख दस्तऐवज मानले जाते.
- स्वाक्षरी पडताळणी: पॅन कार्डवर कार्डधारकाची स्वाक्षरी असते आणि त्याचा वापर विविध आर्थिक व्यवहारांमध्ये आवश्यक स्वाक्षरी पडताळणीसाठी केला जातो.
सुरुवातीची 5 कॅरेक्टर्स
पॅन कार्डमधील पहिल्या 5 कॅरेक्टर्सपैकी पहिली तीन कॅरेक्टर्स प्राप्तिकर खात्याच्या अल्फाबेट सीरिजचं प्रतिनिधित्व करतात, जी एएए (AAA) ते झेडझेड (ZZ) या सीरिजमध्ये येते. चौथ्या कॅरेक्टर्स मध्ये तुमची प्राप्तिकर खात्याच्या दृष्टीने ओळख दडलेली असते. जसे की नोकरदार, व्यापारी किंवा अन्य उत्पन्न गट
प्रत्येक अक्षराचं महत्व
पॅन कार्डवरील या मालिकेतील प्रत्येक अक्षराला काही ना काही सांगायचे असते. अविभाज्य करदात्यांसाठी प्राप्तिकर विभाग P हे चौथे पात्र म्हणून वापरते. C कंपनीसाठी वापरला जातो. H हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (HUF) वापरला जातो. A चा वापर असोसिएशन ऑफ पर्सन्स (AOP) साठी केला जातो. B चा वापर ही असाच (BOI) महत्वासाठी केला जातो. G सरकारी एजन्सीसाठी वापरली जाते. G सरकारी एजन्सीसाठी वापरली जाते. J चा वापर न्यायिक व्यक्तीसाठी केला जातो. L चा वापर स्थानिक प्राधिकरणासाठी केला जातो. F फर्म / मर्यादित उत्तरदायित्व भागीदारीसाठी वापरले जाते.T चा वापर विश्वासासाठी केला जातो.
नावाच्या पहिल्या अक्षराचाही समावेश
पॅन कार्डचे 5 वे कॅरेक्टर आपल्या आडनावाच्या पहिल्या वर्णाचे प्रतिनिधित्व करते. जसं तुमचं आडनाव राजपूत आहे, तसंच मग तुमच्या पॅन नंबरचं पाचवं कॅरेक्टर R असेल. त्याचबरोबर नॉन-इंडिव्हिज्युल पॅन कार्डधारकांसाठी त्यांच्या पॅन नंबरमधील पाचवे कॅरेक्टर हे त्यांच्या नावाचे पहिले अक्षर असेल. पुढील चार वर्ण नेहमीच संख्यात्मक असतात जे पॅन कार्ड मालिकेचे अनुक्रमिक क्रमांक असतात आणि ते 1 ते 9 पर्यंतच्या असलेल्या संख्येचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या पॅन नंबरमधील शेवटचे कॅरेक्टर नेहमीच एक वर्णमाला असते.